Posts

Showing posts from February, 2021

निरावागजच्या सरपंच पदी सौ.विद्या दत्तात्रय भोसले यांची निवड

Image
  निरावागज :नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निरावागज गावच्या सरपंच पदी सौ.विद्या दत्तात्रय भोसले यांची व मा.संग्रामसिंह विश्वासराव देवकाते यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी एक एकाच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पी.एस.मारकड यांनी दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. या निवडणुकीत पंधरा सदस्य संख्या असणाऱ्या या निरावागज गावाने युवकांबरोबरच अनुभव असणाऱ्या माझी पदाधिकाऱ्यांना देखील संधी देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत वाघेश्वरी माता ग्राम विकास पॅनल ला १५ पैकी १४ जागा मिळवत घवघवीत यश मिळाले तर एक उमेदवार सौ. ललिता भोसले या अपक्ष निवडून आल्या.               यावेळी गावचे नेते विश्वासराव देवकाते, मदन नाना देवकाते, संपतराव देवकाते, राजाभाऊ देवकाते, गणपतराव देवकाते, लक्ष्मण भोसले, यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गुलाब देवकाते, सुरेश देवकाते, विलास देवकाते, सुनील देवकाते, ज्ञानदेव देवकाते, रमेश देवकाते, राजेंद्र कुंभार, नामदेव मदने, सोमनाथ भोसले, चंद्रराव देवकाते, गोविंद देवकाते, राजेंद्र भोसले, ज्ञानदेव बुरुंगले, गावचे पोलीस पाटील

घाडगेवाडीत शिवजयंती नाचून नव्हे वाचून साजरी

Image
  बारामती:छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून त्यांचे विचार डोक्यात घेऊन रोजच्या जीवनात आचरणात आणण्याचा विषय आहे. ढाल-तलवारी पलीकडचे शिवराय शिवप्रेमींना समजावे या उद्देशाने घाडगेवाडी येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समिती तर्फे शिवजयंती नाचून साजरी न करता वाचून साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ चौकात उपस्थितांच्या हस्ते शिवपुजन करून उपस्थित शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या चरित्राच्या पुस्तकांच्या प्रति वितरित करण्यात आल्या. या प्रसंगी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक विशाल भगत, घाडगेवाडी शाखा उपाध्यक्ष कार्तिक काकडे, प्रशांत काकडे, रणजित तुपे, सोमनाथ जगदाळे, अमोल साबळे, सुर्यकांत काकडे, लालासो तुपे, अंकुश पवार, चंद्रकांत तुपे, राजेंद्र बळीप, सोमनाथ चव्हाण, शरद घोरपडे, हिंदुराव घाडगे, गणेश कळसकर, प्रकाश मगर, सुमित भोसले, राहुल काकडे, प्रविण तुपे, सोमनाथ कळसकर, बाळासो बाबर, सोमनाथ चव्हाण आदी घाडगेवाडी गावातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शिवजयंती निमित्त रविवारी शाहिर रा

मुस्लिम समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Image
  बारामती:दि.१९\०२\२०२१रोजी ब्लु पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठान व मक्सद युथ फाऊंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजाला सोबत घेऊन मुस्लिम समाजाच्या वतीने बहुजनप्रतीपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सावित्रीबाई फुले सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच मुस्लिम समाज व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मुनिर तांबोळी व अॅड. सोहेल शेख यांनी योग्य ते मार्गदर्शन केले      त्यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना ब्लु पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी केली. तसेच मक्सद युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अमिर भाई शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यावेळी ब्लु पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठान चे सचिव अक्षय शेलार, कार्याध्यक्ष मयुर कांबळे,विक्रम पंत थोरात,मक्सद युथ फाऊंडेशन चे उपाध्यक्ष अकिल बागवान , कार्याध्यक्ष सोहेल मुलाणी अहमद शेख,अफसर बागवान, इरफानभाई,मुन्नाभाई बागवान,मन्सुरभाई शेख,अतुल गोडसे, अरबाज झारी, हुसेन शेख, सलिम भाई शेख, मुस्तकिम अत्तार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.