Posts

Showing posts from November, 2021

इस्लामपूर वाघवाडी फाट्या जवळ 11 लाखांचे कोकेन जप्त; पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद

Image
  इस्लामपूर( प्रतिनिधी/इकबाल पीरज़ादे) पुणे-बेंगळूर आशियाई मार्गावर इस्लामपूर जवळ असणाऱ्या वाघवाडी फाटा येथे बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . त्याच्याकडून ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन पोलिसांनी  हस्तगत केले आहे.              या कारवाईने खळबळ उडाली आहे. माकेटो जॉन झाकिया(२५,रा. जमोरिया मंगानो, टांझानिया) असे संशयित  तरुणआरोपींचे नाव आहे. झाकिया हा खाजगी ट्रॅव्हल्स बस क्र. के. ए.- ५१ -ए. एफ. ६२९१ मधून  मुंबई हुन बेंगलोरकडे  अंमली पदार्थ जवळ बाळगून प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . पोलिसांनी इस्लामपूर जवळील वाघवाडी फाटा येथे सापळा लावला होता . बसची झडती घेतली असता झाकिया  त्याच्या बॅग मध्ये १०९ ग्रॅम कोकेन  हा अमली पदार्थ मिळून आला. अंमली पदार्थ व एक मोबाईल ही पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक ठोंबरे यांनी वर्दी दिली.झाकिया विरुध्द अंमली पदार्थ द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधि.१९८५ चे कलम १६,२१ नुसार गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सपोनि साळुखे करीत आहे

सामाजिक ऐक्य बांधिलकी जपत भाजी विक्रेते फारूक(चाचा ) तांबोळी यांच्या कुटुंबीयांना लोकवर्गणीतून मदत देण्यात आली.

Image
बारामती:आज रोजी दि.24 /11 /2021 वार बुधवार या दिवशी  उपविभागीय  अधिकारी बारामती . मा. गणेश इंगळेसाहेब व तसेच बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. सुनिल महाडीकसाहेब यांच्या हस्ते कुटुंबीयांना रोख रक्कम स्वरुपात मदत देण्यात आली. 13/11/2021 रोजी वार शनिवार भाजी विक्रेते फारुख(चाचा)  इसाक तांबोळी यांचा लक्ष्मीनारायण नगर कसबा येथे एका  विकृत गुंड हल्लेखोराने खुनी हल्ला केला. फारुक(चाचा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.फारुख(चाचा) घरात एकमेव कमवती व्यक्ती होती.त्यांच्या पश्चात पत्नी तीन मोठ्या मुली व एक सहा वर्षाचा लहान मुलगा आहे.पित्रुछत्र हरवले, घरचा आधरवड गेला.चार मुले आनाथ झाली.तसेच या कुटुंबाला आजच्या घडीला उदरनिर्वाहचे कुठलेही साधन नाही. हे जाणून सामाजिक कार्यकर्ते व पोलिस प्रशासनाने आर्थिक मदतीचे आवाहन जनतेला केले. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी मदत म्हणून गुगल पे, फोन पे, आणि रोख स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे रक्कम जमा केली.  सामाजिक भावनेतून मदत म्हणून आलेल्या लोकवर्गणीतून मिळालेली रक्कम  एक लाख ३९ हजार १०० रुपये /- आज रोजी त्यांचे कुटुंबीय पत्नी व मुले यांच्याकडे

अखेर "तो" विकृत पोलीस हणमंत देवकर निलंबित

Image
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी दिला निलंबनाचा आदेश इस्लामपूर (प्रतिनिधी/इकबाल पीरज़ादे) * इस्लामपुरात तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करणारा विकृत पोलीस शिपाई हणमंत कृष्णा देवकर याचे आज मंगळवारी निलंबन झाले. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी निलंबनाचे आदेश काढला.       महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) याला सोमवारी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने २७ नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश असताना निलंबनाची कारवाई झाल्याने  पोलीस दलात खळबळ माजली आहे. याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   संबंधित पीडित विद्यार्थ्यांच्या गर्लफ्रेंडशी शारीरिक संबंधास नकार दिल्याचा राग मनात धरून त्या विकृत पोलीस कर्मचाऱ्यांने ४ हजारांची खंडणी उकळत अनैसर्गिक अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली होती. २७ ऑक्टोबरला पहाटे तीन वाजता पेट्रोलिंग करीत असताना पीडित मुलगा घरी जात असताना देवकर व एक पोलिस क

गावाचा विकास हाच सरपंच सेवा संघाचा ध्यास

Image
अहमदनगर जिल्हा (प्रतिनिधी/रोहित पवार)गावाचा विकास हाच सरपंच सेवा संघाचा ध्यास ...हे ब्रीद वाक्य घेऊन चार वर्षांपूर्वी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना केली आहे.सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही  सरपंच संघटना महाराष्ट्रातील सरपंच यांचे न्याय हक्क व मागणीसाठी सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच यांचे न्याय हक्क व मागणीसाठी लढा देणारी पहिली नोंदणीकृत सरपंच संघटना आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यभर कार्य करत असुन पंधरा हजार सरपंच सभासद आहे. सरपंच सेवा संघाने २१कलमी मागणीचा कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्र शासन दरबारी अनेक मागण्या करून घेतल्या आहेत.या मध्ये प्रामुख्याने सरपंच मानधन  वाढ हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न सरपंच सेवा सघाने सोडविला आहे. येत्या काळात सरपंच विज बिलाचा प्रश्न,प्रत्येक  सरपंच सरपंच यांना संगणक परिचारक नेमणुकीचा अधिकार व सोबत सरपंच यांना जास्तीचे अधिकार अशा अनेक मागण्या सरपंच सेवा संघाच्या वतीने शासनदरबारी सरपंचांच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुन सर्वच्या सर्व म

बारामतीतील अभिषेक पेंट्स या लोकप्रिय रंगाच्या दुकानाने 'एशियन पेंट्स चा क्लासिक पीसी मेंबर होण्याचा बहुमान मिळविला आहे.

Image
बारामती:(प्रतिनिधी-- पैगंबर शेख) शहरातील पाटस रोड स्थित अभिषेक पेंट्स या लोकप्रिय रंगाच्या दुकानाने 'एशियन पेंट्स चा क्लासिक पीसी मेंबर होण्याचा बहुमान मिळविला आहे. एशियन पेंट्स च्या प्रतिनिधींनी बारामतीत येऊन हा सन्मान केला आहे. बारामती हे विकासाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. दिवसेंदिवस बारामतीच्या सौंदर्यात भर पडणाऱ्या गगनचुंबी इमारती, शासकीय तसेच खाजगी कार्यालये उभी राहत आहेत. आणि त्यांना अधिक आकर्षक करण्यासाठी रंगाची ही मागणी ही बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आहे. अभिषेक पेंट्स ही आपलं वेगळेपण जपत, ग्राहकांच्या मागणीचा विचार करून  नामांकित कंपन्यांचे विनम्र सेवेसह सर्वोत्कृष्ट दर्जाचे रंग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणी राहु.  याच वेगळेपणा मुळे आणि ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे अभिषेक पेंट्स ला हा बहुमान मिळाला असल्याचे सर्वेसर्वा सुनील शिंदे व संतोष शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच मित्र परिवार, कंत्राटदार, छोटे मोठे दुकानदार या सर्वांचे ही त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.

आम्हाला सुर्य आणी चंद्र यातील फरक कळला नाही:- साहित्यिक,नामदेव भोसले

Image
  (प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी)          आजुन आमंच्या आयुष्यात सुर्य उगवला नाही . भुर्रकटलेल्या माळावरती भुरकटलो हजारो कुसाळांसी संघर्ष  करत आयुष्यभर भिक्षा मागत फिरलो   बारामती भिगवंण रोडवर शेटफळगडे येथे भेटलेली हि जोडी आपल्या मंणातील दुःख बोलतात( हा कुठला न्याय देवा.आम्ही पारधी म्हणुन गुन्हेगार काय.तुच सांग देवा आमंचा गुन्हा तरी काय?)       सरकारी सवलीती गावातील प्रतिष्ठित 100 एकर बागागीत. दार करिता दारिद्र्र रेषेच्या सवलती.पुढार्याच्या पाहुण्यासाठी आरक्षण .गायरान, गावठान ,जमीन .व पुनरवंन पाहुण्यासाठी सर्व सकारी सवलती सावकार. पाटिल .पुढारी.सरपंच लोक प्रतिनीधीसाठी मृत्यु झाल्यानंतर स्मशान भुमी देखील  त्यांच्या साठी .        या देशातील खरे आदिवासी जिवन कसे काय ते कधी पाहीले का तुंम्ही गावाबाहेर कुठेही रहा .पाच वर्ष झाले कि फक्त आम्ही सांगेल तिथेच मदान करा .आणि मतदान झाले कि गावात कुठेही भिक्षा मागुन खा .त्यातुन जर कुठे चोरी झाली की त्या चोरीच्या शंखेने बेदम मार खा वरून पोलिसाचे फटके खात पेंढिग गुन्हेचा हार गळ्यात घालुन कलकीत पट्टी माथी बाधुन सारे आयुष्य कोर्टात येर झरा घालात  आयुष्यचा

मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Image
  बारामती - (विशेष प्रतिनिधी/संदिप आढाव)  मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन या ठिकाणी डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. देश व राज्यभरातील सुमारे दोन हजाराहून अधिक पत्रकार बांधव या दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.      मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज बारामती येथील गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांशी पवारांनी अधिवेशना बाबत सविस्तर चर्चा केली अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत अनुकूलता दर्शवली.      यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, समन्वयक सुनील जगताप, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, बारामती तालुका मराठी  पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी व यजमान हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर उपस्थित होते.