आम्हाला सुर्य आणी चंद्र यातील फरक कळला नाही:- साहित्यिक,नामदेव भोसले
(प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी)
आजुन आमंच्या आयुष्यात सुर्य उगवला नाही .
भुर्रकटलेल्या माळावरती भुरकटलो हजारो कुसाळांसी संघर्ष करत आयुष्यभर भिक्षा मागत फिरलो
बारामती भिगवंण रोडवर शेटफळगडे येथे भेटलेली हि जोडी आपल्या मंणातील दुःख बोलतात( हा कुठला न्याय देवा.आम्ही पारधी म्हणुन गुन्हेगार काय.तुच सांग देवा आमंचा गुन्हा तरी काय?)
सरकारी सवलीती गावातील प्रतिष्ठित 100 एकर बागागीत. दार करिता दारिद्र्र रेषेच्या सवलती.पुढार्याच्या पाहुण्यासाठी आरक्षण .गायरान, गावठान ,जमीन .व पुनरवंन पाहुण्यासाठी सर्व सकारी सवलती सावकार. पाटिल .पुढारी.सरपंच लोक प्रतिनीधीसाठी मृत्यु झाल्यानंतर स्मशान भुमी देखील त्यांच्या साठी .
या देशातील खरे आदिवासी जिवन कसे काय ते कधी पाहीले का तुंम्ही गावाबाहेर कुठेही रहा .पाच वर्ष झाले कि फक्त आम्ही सांगेल तिथेच मदान करा .आणि मतदान झाले कि गावात कुठेही भिक्षा मागुन खा .त्यातुन जर कुठे चोरी झाली की त्या चोरीच्या शंखेने बेदम मार खा वरून पोलिसाचे फटके खात पेंढिग गुन्हेचा हार गळ्यात घालुन कलकीत पट्टी माथी बाधुन सारे आयुष्य कोर्टात येर झरा घालात आयुष्यचा शेवटचा श्वास पोलिस स्टेशनला सोडायचा .
हेच मिळाल का आम्हाला स्वतंत्र ? तरी गरीब आनंदाचे गातो गाणी म्हणे सारे जंहासे अच्छा हिंदुस्ता हमारा.प्रत्येकान स्वताला प्रश्न कराव आणि मग आपल्या गावातील गरीबाना न्याय देण्यास प्रयत्न करावे.असे मत नामदेव ज्ञानदेव भोसले साहित्यिक व महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार पुरस्कृत यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment