सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई

 एकूण 77,975/-रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत


सुपा(विशेष प्रतिनिधी - संदिप आढाव) सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील सुपे येथील  अवैध्य मटका चालक नामे 1. प्रल्हाद दिनकर खरात, 2. शांताराम तुकाराम धेंडे, 3. विजय नामदेव सकट वरील सर्व राहणार सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावरती छापा टाकून दोन मोटर सायकल, तीन मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 65,425/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सुपे व मोरगाव हद्दीतील अवैद्य दारू विक्रेते नामे 1. संजना अर्जुन चव्हाण, 2. परस्मनी पोपी राठोड दोन्ही राहणार सुपे, 3. नवनाथ पांडुरंग तावरे, 4. धनु उर्फ धनंजय नवनाथ तावरे, 5. नंदकिशोर नामदेव नानावत, 6. वच्छला रमेश जगताप सर्व राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे 7. श्रीनिवास संभाजी काटे राहणार कोडोली तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावरती छापा टाकून कारवाई मध्ये एकूण 11560/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरील नमूद कारवाई मध्ये एकूण 77,975/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीनेश कोळी, पोलीस अंमलदार भाऊसाहेब शेंडगे, विशाल गजरे , किसन ताडगे, साळुंखे , तुषार जैनक, नेहाल वनवे महिला पोलीस अमलदार अश्विनी तावरे , रेखा बांडे यांनी मिळून केली.

Comments

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप