Posts

Showing posts from February, 2022

खा.सुप्रिया सुळे यांचे बद्दल अपमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल बारामती येथे बंडातात्या कराडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध

Image
  बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव) बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सातारा याठिकाणी बंडातात्या कराडकर यांनी अकलेचे तारे तोडत दारू विषयावरून अपमानकारक अपशब्द वापरल्याबद्दल बारामती बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बंडातात्या कराडकर यांच्या पुतळ्याचे दहन करून व जोडे मारून तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.      निषेधानंतर बंडातात्या कराडकर यांच्यावर कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. याकरिता बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले.     यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष धनवान वादक,पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधू बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, बारामती तालुका विद्युतवितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष ॲड.रवींद्र माने बारामती तालुका सोशल मिडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर, राष्ट्रवाद

शारदानगरचे मारुती पाचांगणे यांचे निधन

Image
  बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव) शारदानगर (ता. बारामती) येथील शेतकरी व ज्येष्ठ नागरिक मारूती लक्ष्मण पाचांगणे (वय ७५ ) यांचे आज निधन झाले. बुधवार (ता. 2 ) रोजी घराच्या गाईच्या वासराचा काहीसा धक्का त्यांना लागला आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पाचांगणे यांना तातडीने पुढील वैद्यकीय उपचारासाठी बारामती मधील खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु वयोवृद्ध असल्याने त्यांच्याकडून उपचाराला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दैनिक सकाळचे पत्रकार कल्याण पाचांगणे हे त्यांचे पुत्र होत. त्यांच्यामागे तीन विवाहित मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा... ,अखेर राज्यपालांनी केली ओबीसी आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी

Image
  मुंबई (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव) ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत जे विधेयक पाठवले होते त्या अध्यादेशावर आज अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबतचे विधेयक राज्य सरकारकडून तीनवेळा पाठविण्यात आले होते. पण राज्यपालांकडून त्या विधेयकावर स्वाक्षरी झालेली नव्हती. हे विधेयक राज्यपालांकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. या दरम्यान या विधेयकाला मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकवेळा विनंती करण्यात आली होती. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांकडून संपूर्ण बाजू राज्यपालांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर अखेर राज्यपालांनी ओबीसी अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.