ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा... ,अखेर राज्यपालांनी केली ओबीसी आरक्षण विधेयकावर स्वाक्षरी
विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबतचे विधेयक राज्य सरकारकडून तीनवेळा पाठविण्यात आले होते. पण राज्यपालांकडून त्या विधेयकावर स्वाक्षरी झालेली नव्हती. हे विधेयक राज्यपालांकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. या दरम्यान या विधेयकाला मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेकवेळा विनंती करण्यात आली होती. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांकडून संपूर्ण बाजू राज्यपालांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर अखेर राज्यपालांनी ओबीसी अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment