Posts

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई

Image
 एकूण 77,975/-रुपयाचा मुद्देमाल केला हस्तगत सुपा(विशेष प्रतिनिधी - संदिप आढाव) सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील सुपे येथील  अवैध्य मटका चालक नामे 1. प्रल्हाद दिनकर खरात, 2. शांताराम तुकाराम धेंडे, 3. विजय नामदेव सकट वरील सर्व राहणार सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावरती छापा टाकून दोन मोटर सायकल, तीन मोबाईल व रोख रक्कम असे एकूण 65,425/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सुपे व मोरगाव हद्दीतील अवैद्य दारू विक्रेते नामे 1. संजना अर्जुन चव्हाण, 2. परस्मनी पोपी राठोड दोन्ही राहणार सुपे, 3. नवनाथ पांडुरंग तावरे, 4. धनु उर्फ धनंजय नवनाथ तावरे, 5. नंदकिशोर नामदेव नानावत, 6. वच्छला रमेश जगताप सर्व राहणार मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे 7. श्रीनिवास संभाजी काटे राहणार कोडोली तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावरती छापा टाकून कारवाई मध्ये एकूण 11560/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरील नमूद कारवाई मध्ये एकूण 77,975/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद

खासदार सुप्रिया सुळे संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्काराने दिल्लीतील कार्यक्रमात सन्मानित....

Image
 सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद उत्कृष्ट महारत्न...  दिल्ली (विशेष प्रतिनिधि- संदिप आढाव) चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्या वतीने सर्वोत्तम संसदीय कामकाजासाठी देण्यात येणारा संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार आज खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात तेलंगणाच्या राज्यपाल तसेच पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या हस्ते सुळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संजय किशन कौल, गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा, संसदरत्न अवाॅर्ड कमिटीच्या चेअरपर्सन आणि फाउंडेशनच्या विश्वस्त प्रियदर्शनी राहुल आदी यावेळी उपस्थित होते. पुरस्कार आणि संस्थेविषयी फौंडेशनचे श्रीनिवासन यांनी यावेळी माहिती दिली. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून संसदरत्न, विशेष संसदरत्न, संसद महारत्न तसेच संसद मनरत्न पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे या संस

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

Image
बारामती (प्रतिनिधि):  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बारामती सायकल क्लब हा बारामती तालुक्याच्या पंचकोशीत पहिल्यांदाच बारामती ते गुजरात स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी सायकलिंग करणारा ग्रुप ठरला,  बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बारामती ते स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात या ठिकाणी बारामती सायकल क्लबचे सदस्य निलेश उत्तमराव घोडके, सचिन जोशी, प्रद्युम्न मिसाळ, कार्तिक निंबाळकर, सौरभ नाकुरे, शंकर माळवे, B M भोसले, उमेश पाटोळे ह्या सदस्यांनी ४ दिवसात जवळपास ६७० किलोमीटर सायकलिंग करून बारामती ते स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात हा सायकल प्रवास पूर्ण केला ,असा सायकल प्रवास करणारा बारामती मधील हा पहिलाच सायकलिंग  ग्रुप ठरला 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असा प्रवास बारामतीवरून सुरूवात करून अहमदनगर ,राहुरी, लोणीमुक्काम, दुसऱ्या दिवसी सिन्नर ,नाशिक,वणीमार्गे सापुतरा मुक्काम तिसऱ्या  दिवशी  मुंडा सर्कल,मांडवीमार्गे नेञम मुक्काम चौथ्या दिवशी राजपिपळामार्गे युनिटी ठिकाणी पोहोचले   या टीम ने आज पर्यंत बारामती -अष्टविनायक बारामती - गणपतीपुळे  बारामती- पंढरपूर बारामती- पुणे असे अनेक प्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

Image
  बारामती (सह- संपादक- संदिप आढाव)     सकल ओबीसी व भटक्या विमुक्त   समितीच्या माध्यमातून ओबीसी वरील झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आमदार,खासदार,मंत्री महोदय यांना जाब विचारण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर 1 फेब्रुवारी 2024 ला शांततेच्या मार्गात धरणे आंदोलन व निवेदनदेण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचाच भाग म्हणून बारामतीचे लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीसमोर धरणे आंदोलन व निवेदन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.     तरी सर्व सकल ओबीसी व भटक्या विमुक्त समाजाने प्रत्येक गावातून,वाड्या वस्तीवरून मोठ्या संख्येने ओबिसी आरक्षण संरक्षणासाठी  उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.  तरी सर्व ओबीसी बांधवांनी पंचायत समिती बारामती येथे सकाळी दहा वाजता बहुसंख्येने जमावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पाणीपुरी विक्रेत्याला २ गावठी पिस्तूल ५ जिवंत काडतुसासह अटक

Image
  शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या नांदेड  (प्रतिनिधी - संभाजी पुरीगोसावी) नांदेड शहरांतील नवा मोंढा भागात २ गावठी पिस्तूल आणि जिवंत ५ काडतुसेची विक्री करणाऱ्याला भोकर येथील पाणीपुरी विक्रेत्याला शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.पाणीपुरी विक्रेतावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सणासुदीच्या दिवसात ग्रस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांना त्यांच्या हद्दीत  काहीजण गावठी पिस्तूल विक्री करण्यास येणार असल्यांचे गोपनीय माहिती मिळाली सोनकांबळे यांनी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या कानावर घातली त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अगदी शिताफीने आरोपी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांस ताब्यात घेवुन त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ २ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे सापडली शिवाजीनगर पोलिसांनी त्याची पूर्ण माहिती घेतली असता.  संजय लोकेद्रसिंह

मोक्का केस मध्ये फरार असलेल्या आरोपीस युनिट ५ गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Image
  पुणे ( प्रतिनिधि ) पुणे शहरातील मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न या गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींना अटक करणेकामी आदेश पोलीस आयुक्त,यांनी दिले असता युनिट-५ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी यांनी कार्यवाही करणेबाबत सुचना केली त्यानुसार दिनांक १४/०९/२०२३ रोजी युनिट ५ गुन्हे शाखेकडील पो.उप.नि.लोहोटे व तपास टिम युनिट कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, राजस शेख व पृथ्वीराज पांडुळे यांना त्यांचे बातमीदारां मार्फतीने बातमी मिळाली की, कोंढवा पोलीस ठाणेकडील मोक्का सारख्या गुन्हयातील आरोपी नामे साहिल कचरावत हा महमंदवाडी वनीकरण जंगलात, तरवडेवस्ती,कोंढवा येथे लपुन बसलेला आहे. नमुद बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, युनिट - ०५, गुन्हे शाखा,पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली युनिटकडील पथक हे वाहनाने बातमीच्या ठिकाणी वनीकरण जंगलात जाऊन शोध घेतला असता, स्टाफ ओळखत असलेला व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल कचरावत हा एका झाडाच्या बुंध्या जवळ बसलेला दिसला. त्यावेळी नमुद इसमाची व पोलीसांची नजरानजर होताच तो उठुन पळु लागला तेव्हा पोलीसांनी साहिल अर्जुन कचरावत, वय-२२ व

खंडणी वसूल करणे तसेच खंडणी मागणे बाबत वेब पोर्टलच्या संपादकावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल.!

 बारामती (प्रतिनिधी)- बारामती तालुक्यातील एका नामांकित सोसायटीमध्ये राहत असलेल्या वेब पोर्टल चे संपादक व त्यांच्या नातेवाईकात सार्वजनिक ठिकाणी सोसायटीमध्ये. वाद चालू होता हा वाद अत्यंत खालच्या पातळीवर व शिवीगाळ एकमेकांना करत सोसायटीमधील नागरिकांना व तेथील असलेल्या लहान मुलां व मुलीन समोर चालला होता. तेथे राहत असलेल्या एका सोसायटी सभासदांनी चाललेला गोंधळ आपले मोबाईल फोन मध्ये टिपला हा सर्व प्रकार सोसायटीच्या ग्रुप वर टाकला व त्यामध्ये सोसायटी सभासदांना सांगितले आपण येथे चांगले व गुण्या गोविंदाने सोसायटीमध्ये राहतो आणि अशा प्रकारे कोणी दारू पिऊन शिवीगाळ करत धिंगाणा करत असेल तर आपल्या लहान मुलांवर याचे वाईट परिणाम होतील यानंतर त्या संध्याकाळी मीटिंग घेऊन सोसायटीमधील नागरिकांनी हा विषय संबंधित सोसायटी मधील रहिवासी यांना  सांगितला. त्यानंतर काही वेळातच संपादकाला फोन करून घडलेल्या प्रकारासंदर्भात सोसायटीतील सर्व सभासदांनी सांगण्याचे ठरवले सभासद फिर्यादीने त्यास फोन करून सांगितले असता त्याच वेळी सदर वेब पोर्टलच्या संपादक यांनी समोरील फोन करणाऱ्या व्यक्तीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याला