पाणीपुरी विक्रेत्याला २ गावठी पिस्तूल ५ जिवंत काडतुसासह अटक
शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
नांदेड (प्रतिनिधी - संभाजी पुरीगोसावी) नांदेड शहरांतील नवा मोंढा भागात २ गावठी पिस्तूल आणि जिवंत ५ काडतुसेची विक्री करणाऱ्याला भोकर येथील पाणीपुरी विक्रेत्याला शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.पाणीपुरी विक्रेतावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे सणासुदीच्या दिवसात ग्रस्त घालत असताना गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांना त्यांच्या हद्दीत काहीजण गावठी पिस्तूल विक्री करण्यास येणार असल्यांचे गोपनीय माहिती मिळाली सोनकांबळे यांनी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या कानावर घातली त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अगदी शिताफीने आरोपी पाणीपुरी विक्रेत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांस ताब्यात घेवुन त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळ २ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे सापडली शिवाजीनगर पोलिसांनी त्याची पूर्ण माहिती घेतली असता. संजय लोकेद्रसिंह परिहार (वय २६ ) असे या आरोपींचे नाव आहे. सदर आरोपी भोकर येथे पाणीपुरी विक्री करण्याचे काम करतो.तो मुळाचा मध्यप्रदेश येथील बिलहोटी ता.भोकर जि. दतीया येथील रहिवासी आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अभिनव कुमार पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव आणि पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतील गुन्हे शोध पथकांचे प्रमुख मिलिंद सोनकांबळे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Comments
Post a Comment