टकारी समाजाचे आरक्षणासाठी 18 जानेवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे लक्षवेधी उपोषण...

बारामती:-टकारी जमातीचे दि. 18.01-2021 पासून आझाद मैदान, मुबई मध्ये लक्ष्यवेधी उपोषण होणार असून,टकारी ही दगडी जात्याला टाकी देण्याचा पारपारिक व्यवसाय करणारी एक अतिप्राचीन जमात असून ती पारधी जमातीची एक पोटशाखा  /भाग ( A group within pardhi ) आहे · पारधी जमातीमधील दगडी जात्याला टाकी देण्याचा पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या जमातीना टकारी, टाकणकर किंवा टाकिया या तीन नावाने ओळखतात. इ सं.1881 पासून टकारी जमातीचे वर्गीकरण पारधी जमातीमधील टाकणकर या जमातीबरोबर संयोजित (clubbing ) करून टकारी किंवा टाकणकर अशी नोंद सुद्धा केली असल्याचे मानवंश अभ्यासक शासकीय अहवाल जनगणना अहवाल याचे 18 संदर्भपूरावे -दि. 8-1-2016 रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तसेच आदिवासी विकास विभाग मंत्रालयास दि तक्रारी सोबत सादर केलेले आहेत,टकारी जमातीचा या संदर्भपुराव्याच्या अनुषंगाने योग्य अभ्यास व संशोधन करूनच शासनास अहवाल पाठविण्यात यावा, यासाठी संघटनेने पुणे येथे दि.21 जानेवारी2019  रोजी एकदिवशीय लक्षवेधी केलले आहे. परंतु TRTI, Pune यांनी टकारी जमातीच्या 18 संदर्भपुराव्यांच्या अनुषंगाने कसलाच सकारात्मक किंवा नकारात्मक अभिप्राय नमुद न करता दि 11 मार्च 2020 रोजी शासनास अहवाल पाठविलेला आहे .

      1৪ संदर्भपुराव्याचा कसलाच अभ्यास व संशोधन न करता व त्याकडे निष्काळजीपणे डोळेझाक करून आपली संवैधानिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करून एक प्रकार चा दस्तऐवजासबधी भ्रष्टाचार (documentry Fraud) केलेला आहे.तसेच विमुक्त जातीच्या यादीतील अ.क्र.3 भामटा , 3( a) भामटी यांच्याशी माजी गुन्हेगार असेलल्या टकारी जमातीचा कसलाच सामाजिक संबंध नाही. त्यामुळे अ.क्र 3 भामटा 3( a ) भामटी या नोंदीखालून वगळून त्यांची स्वतंत्रपणे नवीन अनुक्रमांक 3A वर नोंद करावी,यासाठी तक्रार राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचेकडे दि. 21 एप्रिल 2017 पासून प्रलंबित आहे.

     वरील प्रकरणे त्वरीत निकाली  काढावीत यासाठी संघटना उपोषण करीत असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातील टकारी समाज बांधव, भगिनी सहभागी असणार आहे असे टकारी समाज संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदेव जाधव यांनी सांगितले असून या उपोषणास व आरक्षण लढाईसाठी समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य संघटक संतोष जाधव पत्रकार यांनी केले आहे.

Comments

  1. शरद पवार अन् अजित पवार यांनी ह्या समाजाला न्याय मिळवून दिल्यास हा समाज आजन्म राष्ट्रवादी काँग्रेसचा ऋणी राहीन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई