संभाजी बिडीच्या नामांतर लढयास "शिवधर्म फाऊंडेशनला यश"
वृत्त: छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने मागील ८८ वर्षापासून सुरू असलेल्या संभाजी बिडी चे नाव बदलून आता साबळे बिडी करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवधर्म फाऊंडेशनने केलेल्या आमरण उपोषणाला अध्यक्ष श्री. दिपक आण्णा काटे यांना यश आलेआहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ८८ वर्षापासून सुरू असणा-या संभाजीबिडी नावाने छत्रपती संभाजी महाराज यांचे नावाचा एकेरी उल्लेख होऊन त्यांची विटंबना होत असल्याने शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने किल्ले पुरंदर दि.४/९/२०२० रोजी आमरण उपोषण करण्यात आले होते. येथील पोलीसांनी साबळे वाघीरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर उपोषण थांबवण्यात आले होते. शिवधर्म फाऊंडेशनने दिलेल्या या लढयाला यश आले असून, साबळे वाघीरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवधर्म फाऊंडेशन यांना संभाजी बिर्ड नांव बदलून साबळे बिडी असे नांव बदलण्यात आले असल्याचे पत्र दिले आहे.याविषयी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.दिपक आण्णा काटे यांनी हे यश महाराष्ट्रातील शिवशंभो भक्तांचे असून, येथून पुढे देखील शिवधर्म फाऊंडेशन समाज कार्यात सक्रीय असणार असल्याचे यावेळी श्री. काटे यांनी सांगितले.शिवधर्म फाऊंडेशनने केलेल्या उपोषणाला श्री. दिपक आण्णा काटे यांच्यासह मच्छिंद्र टिंगरे,सुनिल पालवे,रवी पडवळ, दिनेश ढगे, सागर पोमण हे या लढयात सहभागी होते.
Comments
Post a Comment