इस्लामपुर भाजी मंडईसाठी १५ कोटी तर रस्ते विकासासाठी १० कोटी : नगरविकास व बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आश्वासन

इसलामपूर(प्रतिनिधि/इकबाल पिरजादे) महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे शनिवारी सांगली  जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते.यावेळी उरूण इस्लामपुर शहराच्या विविध विकास कामाबाबत सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख व उरुण इस्लामपुर नगरपरिषदेचे नगरसेवक आनंदराव पवार (बापु) व उरूण इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी शहरातील विकासकामांच्या निधीबाबत सांगली येथे समक्ष भेटुन संवाद साधला.                    यावेळी माळतळ येथे उभारण्यात येत असलेल्या भाजीमंडई व वहानतळ विकसीत करण्यासाठी १५ कोटी, शहरातील रस्ते विकासासाठी १० कोटी निधी राज्य सरकार देईल असे आश्वासन ना.एकनाथजी शिंदे यांनी दिले तर शहरातील भुयारी गटर योजनेला तात्काळ सुरुवात करण्या बाबत योग्य ते उचित आदेश संबधीत विभागाला व अधिकार्‍यांना देणार असल्याचे यावेळी संवादावेळी ना.एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.           याचबरोबर शहरातील विकासकामांचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेऊन शहराच्या प्रलंबीत कामासाठी व नव्याने सुरु होणार्‍या विकासकामाबाबत आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल असे ही शेवटी ना.एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.यामुळे माळतळ येथे नव्याने सुरु होत असलेल्या भाजी मंडई,वहानतळ या कामाला गती मिळणार आहे तर भुयारी गटरचे काम ही आता गतीने सुरु होईल.या आश्वासनामुळे शहरातील नागरीकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई