हडपसर पोलीसांनी अट्टल दुचाकी गाडया चोरट्यांना जेरबंद करुन ७ लाखाच्या १४ मोटर सायकली केल्या जप्त



पुणे: शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्हयास प्रतिबंध करुन,चोरीचे गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने दिनांक- ०५/०३/२०२१ रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका मोटर सायकलवरुन तीन मुले जोरात पुण्याच्या दिशेने जातअसताना दिसल्याने लागलीच सोबतच्या स्टाफचे मदतीने त्या मोटर सायकलचा पाठलाग करुन पकडुन ताब्यात घेवून त्याना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांचे नावे १) शुभम संजय धुमाळ वय २१ वर्षे रा.धुमाळमाळा थेऊर फाटयाजवळ, लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे. २) स्वप्नील विलास उकरंडे वय २१ वर्षे रा.संजुदा कॉम्प्लेक्स शेजारी, कपिल हाईटस, प्लॅट नंबर-३०२, तिसरा मजला, पापडे वस्ती,फुरसुंगी हडपसर पुणे ३) मंजुनाथ नागेश माने वय २२ वर्षे रा.गल्ली नंबर-२, विदयाविहार कॉलनी, डी.पी. रोड माळवाडी हडपसर पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचे ताब्यात असलेल्या नंबर नसलेल्या हिरो होन्डा स्प्लेन्डंर मोटर सायकलच्या गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना मोटर सायकलसह वरिल स्टाफचे मदतीने हडपसर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे सदर मोटर सायकलीबाबत विश्वासात घेवुन तपास केला असता सदरची मोटर सायकल त्यांनी त्याचे साथीदार याचेसह फुरसुंगी गावठाण,हडपसर पुणे. याठिकाणाहुन चोरी केल्याचे सांगितले. हिरो होन्डा स्प्लेन्डर मोटर सायकल याचे चॅसी व इंजिन नंबरवरुन हडपसर पोलीस स्टेशनकडील क्राईम रजिस्टरची पडताळणी केली असता सदरची मोटर सायकलचे आर.टी.ओ.नंबर- एम.एच. १२ जी.एक्स. ४८०५ असा असुन त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर- १९५/२०२१ भा.द.वि.कलम- ३७९ या गुन्हयात चोरली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना वरील नमूद गुन्हयात दिनांक ०५/०३/२०२१ रोजी १६.१० वाजता अटक करण्यात आली आहे.

       अटक आरोपी नामे.१) शुभम संजय धुमाळ वय २१ वर्षे रा.धुमाळमाळा थेऊर फाटयाजवळ,लोणी काळभोर ता.हवेली जि.पुणे. २) स्वप्नील विलास उकरंडे वय २१ वर्षे रा.संजुदा कॉम्प्लेक्स शेजारी, कपिल हाईटस, प्लॅट नंबर-३०२, तिसरा मजला पापडे वस्ती फुरसुंगी हडपसर पुणे ३) मंजुनाथ नागेश माने वय २२ वर्षे रा.गल्ली नंबर-२, विदयाविहार कॉलनी, डी.पी. रोड माळवाडी हडपसर पुणे ४) आदित्य ऊर्फ दादया बबन शिंदे वय २३ वर्षे रा.स.नं. १६५,माळवाडी हडपसर पुणे. यांचेकडे सचोटीने व कौशल्यपुर्वक तपास करता त्यांनी वाहन चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगुन एकुण किंमत रुपये ०६,५०,०००/- चे एकुण १४ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटार सायकली गाडया जप्त करणेत आले आहे. हस्तगत केलेल्या मोटारसायकल पैकी हडपसर पोलीस ठाणे हद्दीतील १० मोटारसायकली, १ येरवडा, १ लोणीकाळभोर हद्दीतुन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच इतर २ दुचाकी मोटारसायकल बाबत अधिक तपास चालु आहे. सदर आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील अट्टल चोरटे असुन त्यांचेकडे हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

           सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा.नम्रता पाटील,पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री.कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे,श्री. बाळकृष्ण कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर, पोनि.(गुन्हे) श्री.राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री.दिगबंर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड,पोलीस उप निरीक्षक सौरभ माने,पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे,नितीन मुंढे,अकबर शेख, शाहीद शेख, सचिन जाधव शशिकांत नाळे, समीर पांडुळे,प्रशांत दुधाळ, निखील पवार अविनाश गोसावी,सैदोबा भोजराव,संदिप राठोड, प्रशांत टोणपे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई