खुन करून कॅनॉल मध्ये टाकलेल्या मृतदेहाचे गुढ हडपसर पोलीस कडुन उघडकीस
हडपसर: दिनांक १५/०३/२०२१ रोजी दुपारी १२.३० वाजण्याचे सुमारास शिंदेवस्ती, हडपसर पुणे येथे वाहत्या पाण्याचे कॅनॉलमध्ये, एक इसमाची बॉडी वाहत आल्याने सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता,मयत बॉडीच्या ताब्यात मिळून आलेले साहीत्य यावरून सदरची मयत बॉडी ही इसम नामे राहुल श्रीकृष्ण नेने वय ४५ वर्षे रा. नागनाथ पार्क, सदाशिव पेठ पुणे याची असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे चेहऱ्यावरिल जखमा व आलेले रक्त यावरून घातपाताचा संशय आल्याने लागलीच सदची बॉडी ही ससुन हॉस्पीटल येथे पाठूवन पोस्ट मॉर्टम होवून मयत इसमास मरण हे धारधार शस्त्राने गंभिर जखमा करून आले असल्याचे अहवाल प्राप्त झाल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं २३४/२०२१ भादंविक ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे, मयत बॉडी ही कॅनॉलने वाहत आली असल्याने व कॅनॉल ला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मयत बॉडी ही जास्तीत जास्त १ दिवसापूर्वी ची असल्याची शक्यता गृहीत धरून तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी शिंदेवस्ती हडपसर पासून ते जनता वसाहत,पर्वती पायथा, पानमळा, गणेशमळा परिसरातील कॅनॉल लगत राहणाऱ्या लोकांकडे विचारपूस केली असता, त्यांनी वरिल वर्णनाची बॉडी वाहत गेली असल्याची अधिकृत माहिती दिली. त्यानंतर हडपसर तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांची तिन पथके करून त्या परिसरातील अहोरात्र सुमारे २५० पेक्षा जास्त सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, मयत इसम हा दिनांक १२/०३/२०२१ रोजी धायरी, सिंहगड भागात राहत असल्याची माहीती मिळाली. त्यानंतर त्याभागात जावून मयत इसम राहत असलेल्या भागातील सी.सी.टी.व्ही फुटेज पाहत असताना, मयत इसम हा दिनांक १३/०३/२०२१ रोजी रात्रौ नंतर परत घरी आला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे झाला प्रकार हा यानंतर झाला असल्याची शक्यता गृहीत धरून धायरी सिंहगड रोड, संतोष हॉल, राजाराम पुल, दांडेकर पुल, या रस्त्यावरिल सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करीतअसताना, तपास पथकातील टिमला यातील मयत इसमास एका डिओ मोपेड गाडीवर मध्ये बसवून घेवून जात असताना मिळून आले. त्याबाबत सखोल पुढील पाहणी केली असता, सदर इसमांनी त्यास दांडेकर पुला नजिक असलेल्या निर्मीती बिल्डींगचे गाळ्यामध्ये असलेल्या एस.बी.आय चे एटीएम मध्ये नेवून मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून घेवून पुन्हा मारहाण करीत गाडीवर बसवून घेवून गेले. त्यानंतर पुढील तपासा दरम्यान प्राप्त फुटेज वरून तपास केला असता, सदर फुटेज मधिल इसम हा रेकॉर्डवरिल आरोपीत इसम सतीश संजय सुतार रा.नव्हे, सिंहगड पुणे व त्याचा साथीदार मिलींद सोनबा पवळे रा. धायरी फाटा असे असल्याचे समजले. त्यानंतर त्यांना विश्वासात घेवून घडले घटनेबाबत माहीती घेतली असता, त्या दोघांनी मयताकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतलेले होते व त्यास जिवंत ठेवले तर तो आपली ओळख पोलीसांना सांगेल या भितीपोटी त्यांनी त्या इसमास पर्वती येथिल शंकर मंदिरा लगत असलेल्या कॅनॉल जवळ घेवून जावून त्याचे डोक्यात दगड घालून त्यास गंभिर जखमी अवस्थेत कॅनॉलमध्ये टाकून त्याचा खुन केला असल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ४ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री.कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन,पुणे शहर, पोनि.(गुन्हे) श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री. दिगबर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने,पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, सैदोबा भोजराव, अविनाश गोसावी,संदिप राठोड, नितीन मुंढे, शशिकांत नाळे, अकबर शेख प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, सचिन जाधव, शाहीद शेख, समीर पांडुळे, निखील पवार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
Comments
Post a Comment