इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यातील सोने लॉंड्री व्यावसायिकाने केले परत
बारामती (प्रतिनिधी- संदिप आढाव) बारामती येथील जुन्या कचेरी शेजारी असलेल्या प्रकाश नवले यांचे त्यांच्या घरी कपडे धुलाई व इस्त्रीचा लॉंड्री व्यवसाय असून गेली ४० वर्षांपासूनचा त्यांचा पूर्ववतचा व्यवसाय आहे. दि.१९ मार्च रोजी त्यांचेकडे सोनवडी सुपे येथील सोमनाथ मोरे यांच्या इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये मोरे यांच्या घरातील महिलेचे अर्धा तोळा दरम्यानचे तेवीस हजार रुपयांचे सोने आले. सोने पाहताक्षणी लगेच लॉंड्री व्यावसायिक प्रकाश नवले यांनी सोमनाथ मोरे यांना फोनद्वारे संपर्क केला व कपड्यामध्ये सोने आल्याची कल्पना दिली व मोरे यांना बोलावून घेतले आणि त्यांचे सोने परत केले. या घटनेमुळे सोमनाथ मोरे यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला व त्यांनी लॉंड्री व्यावसायिक प्रकाश नवले यांचे आभार मानले. कोरोना सारखा महाभयंकर रोग व लॉकडाऊन च्या कारणे व्यावसायावर परिणाम होऊन आर्थिक अडचण निर्माण झाली असतानाही प्रकाश नवले यांनी आपल्या गिर्हाईकाचे सोने परत केल्याने तेथे उपस्थित बारामती बांधवांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले. यावेळी लॉंड्री व्यावसायिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पवार, परीट धोबी समाज संघटनेचे बारामती शहराध्यक्ष निलेश पवार, विजय लोखंडे, दत्तात्रय पवार, सागर नवले, अंकुश देवकर इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment