फेरेरो इंडियातर्फे कोविड-19 मदतकार्यात सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटलला बारामतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात साह्य
पुणे: फेरेरो इंडियाने सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल अंतर्गत महिला हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यास पाठबळ दिले आहे. इथे स्थानिक समुदायासाठी 100 हॉस्पिटल बेड्स आणि वैद्यकीय उपकरणे पुरवण्यात येणार असून त्यातील १० बेड्स व २० ऑक्सिमीटर आज देण्यात आले व राहिलेले ९० बेड्स एक आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येतीलअशी ग्वाही कंपनीच्या वतीने देण्यात आली. आज आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, स्थानिक मान्यवर आणि फेरेरोचा कर्मचारीवृंद उपस्थित होता. यामुळे बारामती शहर आणि आसपासच्या गावांमध्ये हॉस्पिटल बेड्स उपलब्ध झाल्याने सेवेला साह्य होणार आहे.
या उपक्रमाबद्दल फेरेरो इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, "स्थानिक समुदायाला सेवा देत आरोग्य क्षेत्रातील सामाजिक आणि मानवतावादी उपक्रमांना पाठबळ देण्यास फेरेरो इंडिया बांधिल आहे. समाजाचे ऋण फेडण्याच्या फेरेरो इंडियाच्या बांधिलकीचा भाग म्हणून या महाभयंकर संकटाशी लढा देताना स्थानिक प्रशासनाला आवश्यक साह्य करण्यासाठी त्यांच्या सोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे." भारतासारख्या देशातील सुविधा न पोहोचलेल्या भागांमध्ये रोजगार संधी निर्माण करण्यासाठी फेरेरो ग्रूपच्या मायकल फेरो आंत्रप्रेन्युअल प्रोजेक्टअंतर्गत फेरेरो इंडियाची स्थापना करण्यात आली. बारामतीमधील कारखान्याच्या आसपासच्या समुदायांमध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवेचे प्रकल्प राबवणे हा त्यांचा उद्देश आहे.
Comments
Post a Comment