माजी विद्यार्थ्यांकडून सहा गावांना 35000 मास्क व 500 लिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

 


बारामती: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून "न्यू इंग्लिश स्कूल" लोणी भापकर च्या माजी विद्यार्थ्यांकडून तब्बल सहा गावांना 35000 मास्क व 500 लिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. 

     सामाजिक  बांधिलकीचे भान ठेवून 'न्यू इंग्लिश स्कूल' लोणी भापकर मधील आजी-माजी विद्यार्थी यांनी सायंबाचीवाडी, लोणी भापकर, पळशी,मासाळवाडी, मुढाळे व तरडोली या  बारामती मधील ग्रामीण भागातील गावांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले न्यू इंग्लिश स्कूल लोनी भापकर च्या 2007 च्या बॅचच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला गेला. उपस्थित ग्रामस्थांच्या मधून लोणी भापकर चे सरपंच रवीद्र भापकर, सायंबाचीवाडी चे उपसरपंच प्रमोद जगताप, मुढाळे गावचे सरपंच सागर वाबळे, पळशी गावचे भाऊसाहेब करे मा. बाधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे व सदस्य लखन कोळेकर, मासाळवाडी चे सरपंच सोनबा ठोंबरे तसेच तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले तसेच या उपक्रमात मास्क वितरण करण्याची जबाबदारी सागर भापकर,योगेश गोलांडे,चेतन भापकर,गणेश कडाळे,अमर मोरे तसेच या कार्यक्रमाचे गावो-गावी प्रस्तावना - प्रा. संतोष तांबे, मनोगत - गौरव नागरे (वकिल)  यांनी  तर अमोल भगत (फिल्म डायरेक्टर) यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई