अभिनेत्री मुनमुन दत्ता वर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी :- अँड. धीरज लालबिगे
ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई न झाल्यास समाज्याच्या वतीने तीव्र आंदोलन.
बारामती (दि:११):-अभिनेत्री मुनमुन दत्ता (बबीता) यांनी मेहतर वाल्मिकी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाज्याच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल अभिनेत्रीवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई व्हावी याकरीता अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे (नवी दिल्ली) महराष्ट्र उपाध्यक्ष आणि मेहतर वाल्मिकी विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष अँड. धीरज लालबिगे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार अर्ज केला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या धारावाहीक मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता (बबीता) हीने (दि:९) रोजी एका व्हिडीओद्वारे अपशब्द वापरून समस्त मेहतर वाल्मिकी समाजातील लोकांना अपमानास्पद वागणूक दिली. अभिनेत्री ने जाणीव पुर्वक समाजाच्या विरूध्द अपशब्द वापरून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला . त्यामुळे मेहतर वाल्मिकी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.
सदर अभिनेत्रीचा हा जातीवाचक व्हिडीओ बारामती सह राज्यात व देशात व्हायरल झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आम्हाला काम करण्यास अपमानजनक वाटत आहे. तसेच या अगोदर देखील अनेक वेळा बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्री,अभिनेता यांनी प्रत्येक वेळेस आमच्या समाज्याच्या भावना दुखावल्या असल्याचे समस्त वाल्मीक मेहतर समाजातील नागरिकांकडून सांगितले जात आहे. सदर अभिनेत्री मुनमुन दत्ता (बबीता) यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी . सदर अभिनेत्रीवर कारवाई न झाल्यास संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी समस्त मेहतर वाल्मिकी समाजाने दिला आहे.
Comments
Post a Comment