बारामतीतील लोकअदालत मध्ये 783 खटले निकाली,समुपचाराने मिटले वाद
बारामती तालुका विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमनाने रविवार दिनांक : 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले.यावेळी पहिल्यांदाच लोकादलातची E व्यवस्था करण्यात आली होती.यामध्ये ठेवलेल्या प्रलंबित एकूण केसेस पैकी 783 प्रकरणे निकाली लागून त्यातून दाखल .*पुर्व 4014 प्रकरणे पैकी 664 व कोर्टातील पेंडिंग 1906 प्रकरणे ठेवण्यात आली पैकी 119 प्रकरणे असे एकूण 783 केसेस लोकअदालत मध्ये निकाली निघाल्या.दाखल पूर्व प्रकरणातून 2 कोटी 11लाख 4हजार दोनशे त्र्यांणव रुपायांची वसुली झाली.कोर्ट प्रलबित केसेस मधून 7691901 ( शहात्तर लाख एकयान्नव हजार नउशे एक ) रु. महसूल वसूल झाले.
या प्रसंगी बारामती येथील अति जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा. न्या.जे.पी.दरेकर साहेब व सर्व मा. न्यायाधीश साहेब तसेच बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत.सोकटे, सचिव ऍड.अजित बनसोडे, सहसचिव ऍड.गणेश शेलार, तसेच महाराष्ट्रात पहिल्यांदाच टास्क फोर्स तयार करून अॅड रोहन कांबळे,ॲड राम सूर्यवंशी,ॲड रोहित देवकाते,ॲड प्रकाश डोंबाळे,ॲड सुजित सांगळे,ॲड संतोष येडे,ॲड गणेश लोंढे,ॲड सूरज बनकर,ॲड अक्षय ठोंबरे,ॲड प्रतीक महामुनी,ॲड सचिन दळवी,ॲड विक्रांत कोकरे,ॲड धीरज मदने,ओंकार क्षीरसागर यांनी स्वयंसेवक म्हणून काम करुन अतिशय सुंदर नियोजन करून कार्यक्रम पार पाडला यावेळी बहुसंख्येने वकील व पक्षकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कुठे आणि कधी असते अदालत
ReplyDelete