कृषी पदवी विद्यार्थ्याचे कोरोना काळात आपल्या गावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन




बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत. ग्रामीण जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय,कोल्हापुर मधील कृषीदुत तेजपाल बळासो पोंदकुले हा शिरवली (ता.बारामती जि.पुणे) येथे कार्यरत आहे. सध्या गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. माती परीक्षणाचे फायदे, निंबोळी अर्क निर्मिती, बीजप्रक्रिया, पशुखाद्य प्रक्रिया, बोर्डो पेस्टचा वापर, कीडनाशकांची फवारणीवेळी घ्यावयाची काळजी, तण व्यवस्थापन आदी विषयांबाबत त्याने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.कृषि कार्यानुभव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर विभागीय शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले आहे.

Comments

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई