उपजिल्हा रुग्णालय बारामती येथील अधिकारी कर्मचारी यांचा "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान करण्यात आला

 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय बारामती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे, रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेली दीड वर्ष कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष संभाजी होळकर व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष सुभाष ढोले यांच्याकडून सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य सेवेत काम करणारे सेवक आदींचा  "कोरोना योद्धा" म्हणून स्मुर्ती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव सन्मान करण्यात आला.

  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ढोले यांनी केले तर सूत्रसंचालन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल इंगवले यांनी केले तर कार्यक्रमाचे टी.व्ही मोरे, ॲड.अविनाश गायकवाड,अविनाश लगड,वनिता बनकर,अनिता गायकवाड,आरती शेंडगे, शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

   सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुग्णालयातील ज्येष्ठ अधिपरीचारिका श्रीमती जयश्री देवकाते व क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी हनुमंत शिंदे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमांमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचारी आदींसह १२५ कोरोना योद्धांचा सन्मान सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग या निवासस्थानी ओबीसीचे उद्या आंदोलन ...

बारामती ते गुजरात असा सायकलींग करणारा पहिलाच ग्रुप

सुपा पोलिसांची अवैध मटका व दारू विक्रेते वरती कारवाई