Posts

Showing posts from January, 2021

संभाजी बिडीच्या नामांतर लढयास "शिवधर्म फाऊंडेशनला यश"

Image
वृत्त: छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने मागील ८८ वर्षापासून सुरू असलेल्या संभाजी बिडी चे नाव बदलून आता साबळे बिडी करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवधर्म फाऊंडेशनने केलेल्या आमरण उपोषणाला अध्यक्ष श्री. दिपक आण्णा काटे यांना यश आलेआहे.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ८८ वर्षापासून सुरू असणा-या संभाजीबिडी नावाने छत्रपती संभाजी महाराज यांचे नावाचा एकेरी उल्लेख होऊन त्यांची विटंबना होत असल्याने शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने किल्ले पुरंदर दि.४/९/२०२० रोजी आमरण उपोषण करण्यात आले होते. येथील पोलीसांनी साबळे वाघीरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर उपोषण थांबवण्यात आले होते. शिवधर्म फाऊंडेशनने दिलेल्या या लढयाला यश आले असून, साबळे वाघीरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवधर्म फाऊंडेशन यांना संभाजी बिर्ड नांव बदलून साबळे बिडी असे नांव बदलण्यात आले असल्याचे पत्र दिले आहे.याविषयी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.दिपक आण्णा काटे यांनी हे यश महाराष्ट्रातील शिवशंभो भक्तांचे असून, येथून पुढे देखील शिवधर्म फाऊंडेशन समाज कार्यात सक्रीय असणार असल्याचे यावेळी श्री. काटे यांनी सांगितले.शिवधर्म फाऊं

मूकबधिरअसोसिएशन बारामती च्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रिया संपन्न

Image
  बारामती: नुकताच बारामती या ठिकाणी मूकबधिर असोसिएशनचे बैठक पार पडली यादरम्यान श्री परशुराम बसवा सदस्य राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशन पिपरी चिंचवड, श्री. राहुल साठे सचिव पिंपरी चिंचवड कर्णबधिर असोसिएशन, व मार्गदर्शक श्री संतोष जाधव पत्रकार यांच्या उपस्थितीत मूकबधिर असोसिएशनचे कार्यकारणी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी मूकबधिर असोसिएशन बारामती च्या अध्यक्षपदी श्री. नितीन खोरे,उपाध्यक्ष पदी समीर आत्तार, सचिव पदी भीमराव कोरडे, खजिनदार पदी रुपेश चिंचकर तर कार्यकारिणी सदस्य पदी अशोक मोरे, वैभव हिरवे, वैभव कुंभार, सौ. निर्मला कोरडे, सौ. छाया भोसले यांची निवड करण्यात आली यावेळी मूकबधिर असोसिएशनचे अनेक सदस्य व कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होते, निवड झाल्याचे अभिनंदन करण्यात आले.

इस्लामपूर नगरपालिका सभागृहात लोकनेते राजारामबापूना अभिवादन

Image
इस्लामपूर(प्रतिनिधि/इकबाल पिरजादे) * इस्लामपूर नगर परिषदेमध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांची 37 वि पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इस्लामपूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते मा. अण्णासाहेब डांगे सभागृहातील राजारामबापूंच्या तैल चित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. आष्टा नाका येथील लोकनेते राजाराम बापू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.इस्लामपूर नगरपरिषदेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, नगरसेविका सुनिता सपकाळ, संगीता कांबळे, सीमा पवार, सविता आवटे, कोमल बनसोडे, नगरसेवक आनंदराव मलगुंडे शहाजी पाटील, विक्रम पाटील, खंडेराव जाधव, शकील सय्यद बशीर मुल्ला,  डॉ. संग्राम पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण कांबळे,हौसेराव पाटील, आयुब हवालदार नगर परिषदेचे अधिकारी राजाराम खांबे, साहेबराव जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन गावठी रिव्हाल्व्हर जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद

Image
बारामती: शहर पोलीस स्टेशन हददीत  मा पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांचे आदेशाने शस्त्र बाळगणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणे बाबतचे दिलेल्या सुचने प्रमाणे बारामती शहर हददीतील ग्रामपंचायत इलेक्शनचे व वाढते गुन्हयाच्या अनुषंगाने खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना बारामती हॉस्पिटलचे मागे ०१:४५ वा.चे सुमारास रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रतिक भालचंद्र शिंदे वय २५ वर्षे रा.हरीकृपानगर इंदापुररोड ता बारामती जि.पुणे यावर यापुर्वी ३१६/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल असलेला व त्याचेकडुन पुर्वी दोन पिस्टल जप्त करण्यात आलेला गुन्हेगार संशयीत रित्या फिरत असताना मिळुन आला त्यास आम्ही इकडे कोणत्या कामासाठी आला असे विचारले असता त्याने उडवा उडविची उत्तरे देवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिताफीने पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला २५,०००/-रूपये किंमतीचे एक गावटी बनावटीचे काळे रंगाचे लोखंडी रिव्हाल्व्हर मिळुन आले दोन पंचासमक्ष मुददेमाल ताब्यात घेतला आहे.रिव्हाल्व्हर चे संदर्भाने सखोल चौकशी सुरू आहे.        सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.अभिनव देशमुख सो.व

टकारी समाजाचे आरक्षणासाठी 18 जानेवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे लक्षवेधी उपोषण...

Image
बारामती:-टकारी जमातीचे दि. 18.01-2021 पासून आझाद मैदान, मुबई मध्ये लक्ष्यवेधी उपोषण होणार असून,टकारी ही दगडी जात्याला टाकी देण्याचा पारपारिक व्यवसाय करणारी एक अतिप्राचीन जमात असून ती पारधी जमातीची एक पोटशाखा  /भाग ( A group within pardhi ) आहे · पारधी जमातीमधील दगडी जात्याला टाकी देण्याचा पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या जमातीना टकारी, टाकणकर किंवा टाकिया या तीन नावाने ओळखतात. इ सं.1881 पासून टकारी जमातीचे वर्गीकरण पारधी जमातीमधील टाकणकर या जमातीबरोबर संयोजित (clubbing ) करून टकारी किंवा टाकणकर अशी नोंद सुद्धा केली असल्याचे मानवंश अभ्यासक शासकीय अहवाल जनगणना अहवाल याचे 18 संदर्भपूरावे -दि. 8-1-2016 रोजी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तसेच आदिवासी विकास विभाग मंत्रालयास दि तक्रारी सोबत सादर केलेले आहेत,टकारी जमातीचा या संदर्भपुराव्याच्या अनुषंगाने योग्य अभ्यास व संशोधन करूनच शासनास अहवाल पाठविण्यात यावा, यासाठी संघटनेने पुणे येथे दि.21 जानेवारी2019  रोजी एकदिवशीय लक्षवेधी केलले आहे. परंतु TRTI, Pune यांनी टकारी जमातीच्या 18 संदर्भपुराव्यांच्या अनुषंगाने कसलाच सकारात्मक किंवा नकारात्मक

इस्लामपुर भाजी मंडईसाठी १५ कोटी तर रस्ते विकासासाठी १० कोटी : नगरविकास व बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचे आश्वासन

Image
इसलामपूर(प्रतिनिधि/इकबाल पिरजादे)  महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री ना.एकनाथजी शिंदे शनिवारी सांगली  जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते.यावेळी उरूण इस्लामपुर शहराच्या विविध विकास कामाबाबत सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख व उरुण इस्लामपुर नगरपरिषदेचे नगरसेवक आनंदराव पवार (बापु) व उरूण इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी शहरातील विकासकामांच्या निधीबाबत सांगली येथे समक्ष भेटुन संवाद साधला.                    यावेळी माळतळ येथे उभारण्यात येत असलेल्या भाजीमंडई व वहानतळ विकसीत करण्यासाठी १५ कोटी, शहरातील रस्ते विकासासाठी १० कोटी निधी राज्य सरकार देईल असे आश्वासन ना.एकनाथजी शिंदे यांनी दिले तर शहरातील भुयारी गटर योजनेला तात्काळ सुरुवात करण्या बाबत योग्य ते उचित आदेश संबधीत विभागाला व अधिकार्‍यांना देणार असल्याचे यावेळी संवादावेळी ना.एकनाथजी शिंदे यांनी सांगितले.           याचबरोबर शहरातील विकासकामांचा व प्रलंबीत कामाचा आढावा घेऊन शहराच्या प्रलंबीत कामासाठी व नव्याने सुरु होणार्‍या विकासकामाबाबत आवश्यकतेनुसार निधी दिला

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीसांनी काढला रूट मार्च

Image
बारामती:बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये  मळद व पिंपळी व बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सांगवी,शिरवली, खांडज, निरावागज, मेखळी,सोनगाव, झारगडवाडी,घाडगेवाडी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुक 2021 चे अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये महत्त्वाच्या चौकांमध्ये महत्त्वाच्या गावांमध्ये सरकारी वाहनातील पी एस सिस्टिम वरून आचारसंहिते बाबत तसेच 37 (1)(3)  व माननीय जिल्हाधिकारी सो यांच्याकडील 144 आदेशाबाबत माहिती देऊन सदर ग्रामपंचायत निवडणूक शांततेत निर्भयपणे पार बांधण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सदर रूट मार्च करिता बारामती शहर पोलीस स्टेशन ,बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच बारामती आर सी पी पथक आणि बारामती वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.