Posts

Showing posts from May, 2021

माजी विद्यार्थ्यांकडून सहा गावांना 35000 मास्क व 500 लिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

Image
  बारामती: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून "न्यू इंग्लिश स्कूल" लोणी भापकर च्या माजी विद्यार्थ्यांकडून तब्बल सहा गावांना 35000 मास्क व 500 लिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.       सामाजिक  बांधिलकीचे भान ठेवून 'न्यू इंग्लिश स्कूल' लोणी भापकर मधील आजी-माजी विद्यार्थी यांनी सायंबाचीवाडी, लोणी भापकर, पळशी,मासाळवाडी, मुढाळे व तरडोली या  बारामती मधील ग्रामीण भागातील गावांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले न्यू इंग्लिश स्कूल लोनी भापकर च्या 2007 च्या बॅचच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला गेला. उपस्थित ग्रामस्थांच्या मधून लोणी भापकर चे सरपंच रवीद्र भापकर, सायंबाचीवाडी चे उपसरपंच प्रमोद जगताप, मुढाळे गावचे सरपंच सागर वाबळे, पळशी गावचे भाऊसाहेब करे मा. बाधकाम सभापती जिल्हा परिषद पुणे व सदस्य लखन कोळेकर, मासाळवाडी चे सरपंच सोनबा ठोंबरे तसेच तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले तसेच या उपक्रमात मास्क वितरण करण्याची जबाबदारी सागर भापकर,योगेश गोलांडे,चेतन भापकर,गणेश कडाळे,अमर मोरे तसेच या कार्यक्रमाचे गावो-गावी प्रस्तावना - प्रा. संत

फेरेरो इंडियातर्फे कोविड-19 मदतकार्यात सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटलला बारामतीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात साह्य

Image
पुणे: फेरेरो इंडियाने सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल अंतर्गत महिला हॉस्पिटल मधील कोविड केअर सेंटर येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यास पाठबळ दिले आहे. इथे स्थानिक समुदायासाठी 100 हॉस्पिटल बेड्स आणि वैद्यकीय उपकरणे पुरवण्यात येणार असून त्यातील १० बेड्स व २० ऑक्सिमीटर आज देण्यात आले व राहिलेले ९० बेड्स एक आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येतीलअशी ग्वाही कंपनीच्या वतीने देण्यात आली. आज आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, स्थानिक मान्यवर आणि फेरेरोचा कर्मचारीवृंद उपस्थित होता. यामुळे बारामती शहर आणि आसपासच्या गावांमध्ये हॉस्पिटल बेड्स उपलब्ध झाल्याने सेवेला साह्य होणार आहे.     या उपक्रमाबद्दल फेरेरो इंडियाचे प्रवक्ते म्हणाले, "स्थानिक समुदायाला सेवा देत आरोग्य क्षेत्रातील सामाजिक आणि मानवतावादी उपक्रमांना पाठबळ देण्यास फेरेरो इंडिया बांधिल आहे. समाजाचे ऋण फेडण्याच्या फेरेरो इंडियाच्या बांधिलकीचा भाग म्हणून या महाभयंकर संकटाशी लढा देताना स्थानिक प्रशासनाला आवश्यक साह्य करण्यासाठी त्यांच्या सोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे." भारतासारख्या देशातील

कोयत्याचा धाक दाखवुन जबरी चोरीचा,घरफोडी, मोटारसायकल चोरी करणा-या रेकॉर्डवरिल गुन्हेगारांकडुन कि.रु. ०४,६८,४००/- चे सोन्याचे दागिने,मोबाईल फोन,मोटर सायकल, एल.सी.डी.टी.व्ही. इत्यादी हस्तगत करुन हडपसर पोलीसांनी आवळल्या गुन्हेगारांचे मुसक्या...

Image
  हडपसर:पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १५/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.०० च्या सुमारास मगरपट्टा सिटीमध्ये एका जेष्ठ नागरीकांची वाँकिग करतेवेळी दोन तोळयाची चैन खेचून घेवून गेल्याने जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदरचा दाखल गुन्हा हा मगरपट्टा सारख्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था असताना घडला होता. दोन्ही आरोपी हे अज्ञात होते त्यांनी लाल रंगाच्या पॅशन प्रो मोटारसायकल चा वापर केला असल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजवरून निष्पन्न झालेले होते. सदर गुन्हयाचा तपास हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथके करीत होती.     त्यांनंतर दिनांक १८/०५/२०२१ रोजी सकाळी ०६.१५ च्या सुमारास पुन्हा भोसले गार्डन येथे अज्ञात तीन इसमांनी मॉर्नीग वॉक करणा-या एका महिलेला कोयता दाखवून तिच्या गळ्यातील चैन ओढून नेण्याचा प्रयत्न केला परंतु महिलेच्या सतर्कतेमुळे त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्याच दिवशी सकाळी पहाटे वानवडी पोलीस ठाणेच्या हद्दीत बी.टी.कवडे रोडवर टेम्पो चालकाला कोयत्याचा धाक दाखवून टेम्पोची काच फोडून, ड्रायव्हरवर कोयत्याने वार करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम चोरीस गेलेली होती. घटनास्थळाचे फुटेज पाहीले असता त

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या,सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस निलेश काटे यांची मागणी

Image
  म्हसवड (प्रतिनिधी):रासायनिक खतांच्या दरवाढी मुळे शेतकऱ्यांना पिकांचे पोषण अवघड झाले असून उत्पादन खर्च पेलणे अशक्य होऊन बसले आहे . मागील वर्षा च्या तुलनेत यंदा रासायनिक खताच्या किमतीत 50 टक्के वाढ झाली असून सदर दरवाढ तात्काळ मागे घ्या अशी मागणी निलेश काटे सातारा जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस यांनी केली आहे. शेती पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही औषधे व रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडले आहे परिणामी उत्पादन खर्च दिडपटीने वाढला असून अशा बिकट परिस्थितीला परिसरातील शेतकरी तोंड देत आहे. केंद्रसरकार च्या शेतकरी विरोधी धोरणामुळे रासायनिक खतांचे भाव 50 टक्के ने वाढले आहे.शेतीविषयक औषधे व रासायनिक खतांचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च ची जुळवाजुळव कशी करावी या विवंचनेत बळीराजा अडकला आहे. पूर्वी एक बॅगे मागे 50 ते 100 रुपये भाव वाढ होयची मात्र यंदा अवाजवी दरवाढ झाली आहे.पूर्वी चे DAP खत 1200 रुपये होते आता ते 1900 रुपये झाले 123216 खत 1175 ला होते ते आता 1875 रुपये झाले 1175 ला मिळणारे 102626 आता 1775 रुपयाला झाले तर 400 रुपयाला मिळणारे सुपरफास्ट आता 500 रुपयाला आहे .   शेतकऱ्यांने पावसाळ्या

ईद निमित्त सातव परिवाराच्या वतीने पंधराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप.

Image
  बारामती :-कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे हाताला काम नाही. रोजचा दिवस कसा भागवायचा याची चिंता अनेक मुस्लिम कुटुंबीयांना जाणवत होती. मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी, यासाठी गटनेते सचिन सातव व नगरसेवक सूरज सातव, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांच्या वतीने ईद निमित्त पंधराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप (दि:१२) रोजी  करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव पाहता संपुर्ण राज्यासह देशामध्ये लाॅकडाऊन सुरु असुन जवळपास सर्वच दुकाने,उद्योगधंदे,बंद असल्यामुळे मजूर,कामगार,मध्यमवर्गीय नौकरदार तसेच ७० टक्के मुस्लिम समाज हा व्यवसायात असल्याने लॉकडाऊनच्या काळात मुस्लिम बांधवांना रमजान महिन्यात फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. सण वार कोरोनाच्या छायेत असल्याने हि बाब पाहुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व आशीर्वादाने मा. नगराध्यक्ष सदाशिव बापुजी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते सचिन सातव ,नगरसेवक सुरज सातव माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी सलग दुसऱ्या वर्षी देखील पंधराशे कुंटबांना शिर्रखुमा साहित्य किट व दुध वाटप के

अभिनेत्री मुनमुन दत्ता वर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी :- अँड. धीरज लालबिगे

ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई न झाल्यास समाज्याच्या वतीने तीव्र आंदोलन. बारामती (दि:११):-अभिनेत्री मुनमुन दत्ता (बबीता) यांनी मेहतर वाल्मिकी समाजाबद्दल अपशब्द  वापरून समाज्याच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल अभिनेत्रीवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कारवाई व्हावी याकरीता अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे (नवी दिल्ली) महराष्ट्र उपाध्यक्ष आणि मेहतर वाल्मिकी विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष अँड. धीरज लालबिगे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार अर्ज केला आहे.  तारक मेहता का उल्टा चष्मा या धारावाहीक मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता (बबीता) हीने (दि:९) रोजी एका व्हिडीओद्वारे  अपशब्द वापरून  समस्त मेहतर वाल्मिकी समाजातील लोकांना अपमानास्पद वागणूक दिली. अभिनेत्री ने जाणीव पुर्वक समाजाच्या विरूध्द  अपशब्द वापरून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला . त्यामुळे मेहतर वाल्मिकी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर अभिनेत्रीचा हा जातीवाचक व्हिडीओ  बारामती सह राज्यात व देशात व्हायरल झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आम्हाला काम करण्यास अपमानजनक वाटत आहे. तसेच या अगोदर देखील अनेक वेळा बॉलीवूड मधील अनेक अ