Posts

Showing posts from August, 2021

भगवान वीर गोगादेव मिरवणूक खर्च टाळून कोरोना निधि दिला

Image
  बारामती शहर मध्ये भगवान वीर गोगादेव निशान अखाड़ा गेली 19 वर्ष भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव साजरा करत असतात यावर्षी कोरोना मुळे सामाजिक बंधीलकी जपत निशान अखाड्यने मिरवणूक रद्द करून त्याचा खर्च रक्कम रुपये 15000 कोरोना निधि म्हणून उपमुख्य मंत्री अजीतदादा  पवार यांचे कड़े सुपुर्त केला याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा ताई तावरे गट नेते सचिनशेट सातव उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव नगरसेवक  राजेन्द्र आबा बनकर संभाजी नाना होळकर व नगरसेविका शीतल गायकवाड़               यावेळी निशान अखाड़या चे अध्यक्ष अड़ धीरज लालबीगे विलासराव लालबिगे  संजय मुलतानी आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे आनंद लालबिगे प्रदीप लालबिगे धर्मेंद्र कागड़ा प्रीतम लालबिगे  गोपाल वाल्मिकी  राजेश लोहाट योगेश लालबिगे राज लालबिगे  सचिन वाल्मिकी साजन लालबिगे अतिष  लालबिगे शुभ्रतो झुंज करन मुलतानी ऋतुराज लालबिगे परवेश बागड़े अनिकेत सोलंकी ई कार्यकर्ते उपस्थित होते  भगवान वीर गोगादेव निशान अखाडा नेहमी सामाजिक कामात   सहभाग असतो म्हणून अजित दादा पवार यानी  विशेष कौतुक केले

कृषी पदवी विद्यार्थ्याचे कोरोना काळात आपल्या गावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी सध्या त्यांच्या गावी कार्यरत आहेत. ग्रामीण जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत स्वतःच्या गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय,कोल्हापुर मधील कृषीदुत तेजपाल बळासो पोंदकुले हा शिरवली (ता.बारामती जि.पुणे) येथे कार्यरत आहे. सध्या गावातील शेतकऱ्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन व चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम करत आहे. माती परीक्षणाचे फायदे, निंबोळी अर्क निर्मिती, बीजप्रक्रिया, पशुखाद्य प्रक्रिया, बोर्डो पेस्टचा वापर, कीडनाशकांची फवारणीवेळी घ्यावयाची काळजी, तण व्यवस्थापन आदी विषयांबाबत त्याने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली आहे.कृषि कार्यानुभव उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर विभागीय शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले आहे.

उपजिल्हा रुग्णालय बारामती येथील अधिकारी कर्मचारी यांचा "कोरोना योद्धा" म्हणून सन्मान करण्यात आला

Image
  बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय बारामती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद काळे, रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेली दीड वर्ष कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष संभाजी होळकर व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष सुभाष ढोले यांच्याकडून सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य सेवेत काम करणारे सेवक आदींचा  "कोरोना योद्धा" म्हणून स्मुर्ती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव सन्मान करण्यात आला.   या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ढोले यांनी केले तर सूत्रसंचालन बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल इंगवले यांनी केले तर कार्यक्रमाचे टी.व्ही मोरे, ॲड.अविनाश गायकवाड,अविनाश लगड,वनिता बनकर,अनिता गायकवाड,आरती शेंडगे, शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्

बारामती येथील विद्युत नियंत्रण समितीची पहिली बैठक संपन्न

Image
 . बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव)उर्जाभवन बारामती येथे बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीची पहिली बैठक समितीचे ॲड.रविंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये महावितरण तर्फे चालू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला व  प्रलंबित कामाबाबत ही सकारात्मक चर्चा करण्यात आली. ग्राहकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तसेच वीज बिल वसुली, गावोगावी असलेल्या वीज ग्राहकांना व  शेती पंप  ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या कश्या पद्धतीने सोडवायल्या हव्यात व त्यातून मार्ग काढण्यासंदर्भात ही सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी अध्यक्षीय भाषणात ॲड.रविंद्र माने यांनी सांगितले की आज आपण महावितरण व कमिटी हे एका कुटुंबाप्रमाणे असून महवितरण अधिकारी कर्मचारी वर्ग व अशासकीय कमिटी सदस्य एकत्र मिळून आता काम करावे लागणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती तालुका एकात्मिक व पुनर्विकास कमिटीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या सहकार्याने वीज ग्राहकांना येणाऱ्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न ही कमिटी करेल तसेच सर्व महावितरण चे अधिकारी यांचीदेखील सहका

बारामतीतील लोकअदालत मध्ये 783 खटले निकाली,समुपचाराने मिटले वाद

Image
  बारामती (प्रतिनिधी-संदिप आढाव)       बारामती तालुका विधी सेवा समिती व बारामती वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमनाने रविवार दिनांक : 1 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन  बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात करण्यात आले.यावेळी पहिल्यांदाच लोकादलातची  E व्यवस्था करण्यात आली होती.यामध्ये ठेवलेल्या प्रलंबित एकूण केसेस पैकी 783 प्रकरणे निकाली लागून त्यातून दाखल .*पुर्व 4014 प्रकरणे पैकी 664  व कोर्टातील  पेंडिंग 1906 प्रकरणे ठेवण्यात आली पैकी 119 प्रकरणे असे एकूण 783 केसेस लोकअदालत मध्ये निकाली निघाल्या.दाखल पूर्व प्रकरणातून 2 कोटी 11लाख 4हजार दोनशे त्र्यांणव रुपायांची वसुली झाली.कोर्ट प्रलबित केसेस मधून 7691901 ( शहात्तर लाख एकयान्नव हजार नउशे एक ) रु.  महसूल वसूल झाले.      या प्रसंगी बारामती येथील अति जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा. न्या.जे.पी.दरेकर साहेब व  सर्व मा. न्यायाधीश साहेब तसेच बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत.सोकटे, सचिव ऍड.अजित बनसोडे, सहसचिव ऍड.गणेश शेलार, तसेच महाराष्ट्रात पहिल्यांदाच टास्क फोर्स तयार करून अॅड रोहन कांबळे,ॲड राम सूर्यवंशी,ॲड रोहित द